शाळा गजानन विद्यालय पाटच्या अमृत महोत्सव उदघाटन च्या अनुषंगाने झालेल्या कार्यक्रमा दरम्यान आदरणीय डॉ. श्री. रविंद्र जोशी व भगिरथ प्रतिष्ठानचे आदरणीय श्री. देवधर सर यांनी शाळा गजानन विद्यालय पाटच्या मुलांना सार्थ रामरक्षा पाठांतराचे आव्हान केले आणि विद्यार्थांनी हे शिवधनुष्य लिलया पेलून दाखविले, शाळेसाठी व पालकांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.
याच आव्हानाचा मागोवा घेण्यासाठी आज गीताजयंती आणि मोक्षदा एकादशी या मूहुर्तावर बुधवार दि. ११ डिसेंबर २०२४ रोजी प्रत्यक्ष माननीय श्री. रविंद्र जोशी यांनी व माननीय श्री. देवधर सर यांनी मुलांची रामरक्षा पाठांतर घेतले आणि या अनुषंगाने मुलांना संबोधित केले. यात माननीय श्री. देवधर सर यांनी रामरक्षा का म्हणायची, याने वाणी शुद्ध कशी होते आणि बौद्धिक क्षमता कशी वाढते व घरात अध्यात्मिक उर्जा कशी निर्माण होते याविषयी मार्गदर्शन केले.
माननीय जोशी सर यांनी आपल्या भाषणात मी या शाळेचा विद्यार्थी असून हे माझे गाव आहे याचा मला अभिमान असल्या बाबत सांगितले. तसेच बोलल्या प्रमाणे रामरक्षा पाठांतर करणाऱ्या मुलांना प्रत्येकी ५०० रु. बक्षिस व शाळेसाठी ५oo रू मिळून २१,५०० रु. या उपक्रमात मुलांनी बक्षिस म्हणून मिळविले. माननीय श्री. जोशी सर व माननीय श्री. देवधधर सर यांनी सार्थ रामरक्षा पाठांतर मुलांनी छान केल्याबद्दल मुलांचे कौतुक केले.
सामाजामध्ये परिवर्तन घडायचं असेल तर खरोखरच अशी माणसं देवदूत बनून येतात आणि संपूर्ण जीवन बदलवून टाकू शकतात
खूप खूप धन्यवाद माननीय श्री. जोशी व माननीय श्री. देवधर सर.



