पाट पंचक्रोशी, पाट हायस्कूल आयोजित श्रीमती मालती सिताराम आजगावकर वक्तृत्व स्पर्धा दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी घेण्यात आली. या स्पर्धेत गजानन विद्यालय पाटची विद्यार्थीनी कुमारी हर्षदा गणेश जोशी हीने ग्रंथ हेच गुरू या विषयावर भाषण करून प्रथम क्रमांक पटकावला. हर्षदाचे सर्वांनी पालक व शिक्षकवृंदाने खूप खूप अभिनंदन केले.
