प्रवेशोत्सव

आज शाळा गजानन विद्यालय पाट येथे प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक जागृती साठी सकाळी प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर इयत्ता पहिली मुलांच पुष्प आणि खाऊ देऊन व ओवाळणी करून स्वागत करण्यात आले.


पाहिले पाऊल म्हणून पहिले पाऊल घेण्यात आले त्यानंतर या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर केंद्रप्रमुख मान. श्री. तांबे सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मुलांना मान्यवरांच्या हस्ते पुस्तक, गणवेश व बूट वाटप करण्यात आले.

दुपारी गोड जेवण, जिलेबी देऊन मुलांचा हा दिवस आनंदी व अविस्मरणीय करण्यात आला.