एक राखी पर्यावरण संरक्षणासाठी

वृक्ष वल्ले आम्हा सोयरे हे सार्थ करणेसाठी रक्षाबंधनाच्या दिवशी वृक्षांना राखी बांधण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण करणे होता. विद्यार्थीनी यात उत्साहाने सहभाग घेतला. सर्वांनी वृक्षांना राखी बांधून त्यांचे रक्षण करण्याची शपथ घेतली. या माध्यमातून मानव आणि निसर्ग यांच्यातील नातं अधिक दृढ झाले. वृक्ष आपल्याला प्राणवायू, सावली व अन्न पुरवतात हे सर्वांना पटवून देण्यात आले. लहान मुलांनी वृक्षांना पाणी घालून त्यांची सेवा करण्याची जबाबदारी स्वीकारली. हा उपक्रम पाहून इतरांनीही असेच कार्यक्रम करण्याची प्रेरणा घेतली.

रक्षाबंधनाचा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करून सर्वांना नवा संदेश मिळाला. यानंतर प्रत्यक्ष रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला सर्व मुलांना ओवाळणी करून राखी बांधण्यात आली गोड खाऊ वाटण्यात आला.