घर घर तिरंगा कार्यक्रम शाळेत उत्साहात साजरा

शाळेत चित्रकला स्पर्धेत स्वातंत्र्याचे प्रतीक असलेल्या विविध संकल्पना रंगांच्या माध्यमातून सुंदर रेखाटल्या. रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी रंग वापर करून आकर्षक देशभक्तीपर रांगोळ्या काढल्या.

दुपारी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन देशभक्तीपर घोषवाक्ये देत गावातून रॅली काढली. “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
शेवटी विद्यार्थ्यांना हर घर तिरंगा अभियानाचा संदेश देण्यात आला.

प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवून देशाबद्दलची आपली निष्ठा व अभिमान व्यक्त करावा.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली आणि भारताच्या स्वातंत्र्याचा अभिमान सर्वांच्या मनात रुजला.