अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शाळा गजानन विद्यालय पाट येथे माहेरवाशिणींचा स्नेह मेळावा आयोजित केला होता.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माजी विद्यार्थीनी माहेरवाशिणी व पाट हायस्कूलच्या शिक्षिका सौ. दिपिका दत्तगुरु सामंत यांनी भुषविले तर प्रमुख अतिथी म्हणून माजी विद्यार्थीनी, माहेरवाशिणी व प्राथमिक शिक्षिका सौ. अनुप्रिया राजन मयेकर व इतर मान्यवर माहेरवाशिणी उपस्थित होत्या.
या वेळी व्यासपिठावरुन अनुप्रिया मयेकर, निलांबरी जोशी, मंदा गोसावी, पुष्पलता सुकळवाडकर यांनी आपले विचार मांडले . शाळे बद्दलच्या जुन्या आठवणीना उजाळा दिला. या सर्व माहेरवाशिणींचा अमृतमहोत्सव समितीच्या वतीने सन्मान चिन्ह व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी सुरेश कवटकर यांचा आबा जळवी यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. या नंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा दिपिका सामंत यांनी आपले विचार मांडले. शाळेच्या सुरु असलेल्या प्रगती बाबत शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक वर्गाचे कौतूक केले व पुढील कार्यक्रमांना शुभेच्छा व्यक्त करून ५००० रुपयांची देणगी जाहीर केली. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमृतमहोत्सव समितीचे अध्यक्ष राजनजी मयेकर यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पारकर मॅडम. अमृतमहोत्सव समितीचे अध्यक्ष राजनजी मयेकर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश जोशी. आबा जळवी नामदेव जळवी प्रदीप गोलतकर, शेखर पाटकर, उमा सामंत गुरु तेली, प्रतीक्षा पार्सेकर, समिक्षा दाभोलकर व समितीच्या इतर सदस्यांनी विशेष प्रयत्न केले.
कार्यक्रमाच्या शेवटी महेश वेळकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.






