शाळा पाट गजानन येथे “अनंत मुस्कान” कार्यक्रमाची दमदार सुरुवात.
दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी शाळा पाट गजानन येथे सर्व पालक, विद्यार्थी व शिक्षक यांच्या भरघोस उपस्थितीत अनंत मुस्कान कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पारकर मॅडम यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. या शाळेच्या शिक्षिका श्रीमती मणेरीकर मॅडम यांनी अनंत मुस्कान कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. तोंडाचे आरोग्य का व कसे जपले पाहिजे, लहान मुलांच्या दातांविषयीच्या समस्या का उद्भवतात, कारणे व उपाय यांबाबत स्मार्ट टी.व्ही. च्या माध्यमातून व्हिडिओ व माहिती दाखवून मार्गदर्शन केले.
सर्व पालकांनी चर्चा करून हा विषय समजून घेतला. दात घासण्याची योग्य पद्धत समजून घेतली. हा कार्यक्रम वर्षभर विविध टप्प्यांवर व प्रात्यक्षिकासह चालू राहणार आहे असे मणेरिकर बाईंनी सांगितले.
मुलांच्या दातांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास आपण कटिबद्ध आहोत असे पालकांनी सांगत या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


