केंद्रस्तरीय क्रिडास्पर्धांमध्ये गजानन विद्यालयचे घवघवीत यश

बालकांच्या बौद्धिक विकासा बरोबरच बालकांचा सर्वांगिण विकास व्हावा या उद्देशाने, जिल्हा परिषद सिंधुदुर्गने एक नावीन्य पूर्ण उपक्रम १९९८ – १९९९ ला बाल क्रिडा कला महोत्सव व ज्ञानी मी होणार असा उपक्रम चालू केला.
या उपक्रमाअंतर्गत केंद्र, प्रभाग, तालुका व जिल्हा स्तरावर स्पर्धा घेतल्या जातात.
सन २०२४ -२०२५ च्या केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धां मध्ये गजानन विद्यालय पाट ने घवघवीत यश संपादन केले.

  • कुमारी मृणाली साळगावकर : लांब उडी प्रथम क्रमांक
  • कुमार विनय कुडाळकर : लांबउडी प्रथम क्रमांक
  • कुमार विनय कुडाळकर : १०० मिटर धावणे द्वितीय क्रमांक
  • कुमार राजदत्त राऊळ : लांब उडी द्वितीय क्रमांक
  • कुमार राजदत्त राऊळ : ५० मिटर धावणे द्वितीय क्रमांक
  • कुमार तेजस सावंत : १०० मिटर धावणे द्वितीय क्रमांक
  • लहानगट – समूहगायन : प्रथम क्रमांक
  • मोठा गट – समूहगान : द्वितीय क्रमांक
  • मोठा गट – समूहनृत्य : द्वितीय क्रमांक
  • लहानगट – ज्ञानी मी होणार : प्रथम क्रमांक
  • मोठा गट – ज्ञानी मी होणार : द्वितीय क्रमांक

यशस्वी विद्यार्थाचे, पालक व शिक्षकांच्या वतीने खूप खूप अभिनंदन !!!