सत्कार गुरुशिष्यांचा, क्षण आनंदाचा

सोमवार दि. २१ ऑक्टोबर २०२४ रोजी शाळा गजानन विद्यालय पाट येथील, शोतोकॉन इंटरनॅशनल कराटे डो फेडरेशनने आयोजित केलेल्या आंतरशालेय राष्ट्रीय कराटे स्पर्धेत जे अप्रतिम यश संपादन केले आणि पालक व शाळेचे नाव उज्वल केल, याच्या आनंदातून पालकांनी कराटे प्रशिक्षक मान. श्री. महादेव धोंडू वेळकर सर, वेळकर फाउंडेशन मुंबई आणि स्पर्धेत यशस्वी झालेल्या सर्व मुलांचा सहृदय सत्कार केला.

|| हृदयाच्या आदराचे प्रतिक म्हणजे सत्कार, मनातल्या मायेचे प्रतिक म्हणजे सत्कार, कतृत्ववान मस्तकावर, सन्मानाचा शिरपेच म्हणजे सत्कार ||

आजच्या सत्काराचे असेच काहीसे वर्णन करावे लागेल. आजचा हा पालकांनी केलेला सत्कार मन भारावून टाकणारा होता. सर्वच पालक व शिक्षकवृंदानी मान. श्री. वेळकर, ज्यांच्यामुळे या यशापर्यंत मुले पोहोचली, त्यांचे आणि मुलांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मुलांच्या यशाची दखल घेऊन त्यांचे कौतुक हेच तर त्यांना भरारी घेण्यास बळ देईल.

सर्व पालकांचे शाळेकडून खूप खूप धन्यवाद आणि त्रिवार आभार.