जिल्हा स्तरीय ऑनलाईन रेकॉर्ड डान्स स्पर्धेत गजानन विद्यालय शाळेचे यश

शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री नामदार दिपक केसरकर यांच्या वाढदिवसा निमित्ताने “दिपकभाई केसरकर मित्र मंडळ, सावंतवाडी”“अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, शाखा मालवण” यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.


स्पर्धेसाठी एकूण १८४ शाळांनी भाग घेतला होता व या स्पर्धेत आपल्या गजानन विद्यालय, पाट शाळेला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. रविवार दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी आर. पि. डि. हायस्कूल, सावंतवाडी येथे हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला स्वतः दिपक केसरकर हजर होते.

या स्पर्धांमध्ये प्रतिभागी त्यांच्या कला आणि मेहनतीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. नृत्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व उभरून येते आणि स्पर्धेची रंगत वाढते. अशा स्पर्धांमुळे आत्मविश्वास वाढतो. विद्यार्थ्यांनी खूप मेहनत करून हे यश मिळावले, त्याबद्दल सर्व विद्यार्थीनींचे व मार्गदर्शक शिक्षकांचे खूप खूप अभिनंदन.


साने गुरुजी कथामालेची निर्मिती असलेल्या “चम चम चम पुनवेचा” या गाण्यावर हि स्पर्धा घेण्यात आली होती.

या नृत्य सादरीकरणात पुढील विद्यार्थीनींनी भाग घेतला होता.

  • हर्षदा गणेश जोशी
  • तनया तुकाराम गोसावी
  • आर्या प्रशांत जळवी
  • माहेश्वरी महेश परब
  • तेजल शेखर पाटकर
  • अन्वया शशिकांत पाटकर
  • सत्वशिला गणेश परब
  • मृणाली आनंद साळगावकर
  • प्रामिला लालजी गौड
  • किमया रविंद्र कदम

मार्गदर्शन शिक्षक

  • श्रीमती सविता दत्तात्रय सावंत
  • श्रीमती‌ मेधा मिलिंद मणेरीकर

नृत्य सादरीकरणाचा व्हिडिओ