गुरु ब्रम्हा गुरु विष्णू गुरु देव्ये महेश्वरहा ।
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै
श्री गुरुवे नमः ॥
५ सप्टेंबर शिक्षक दिन, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन एक हाडाचे शिक्षक त्यांना विनम्र अभिवादन.
याच दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा गजानन विद्यालय पाट येथे डिजीटल युगात प्रवेश अर्थात शाळा वेबसाईटचे उदघाटन वेळकर फाउंडेशन चे अध्यक्ष संस्थापक मान. श्री. बाळा महादेव वेळकर यांच्या हस्ते करण्यात आला. श्री. बाळा वेळकर यांनी वेबसाईट का आवश्यक आहे हे सोप्या शब्दात पालकांना सांगितले. वेळकर फाउंडेशनचे खूप खूप मनापासून धन्यवाद.
यावेळी वेळकर फाउंडेशनच्या वतीने मुलांना डिजीटल आय कार्ड चे वाटप करण्यात आले या कार्यकमाला अध्यक्ष म्हणून श्री. गणेश जोशी (अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती) हे लाभले.
याच कार्यक्रमात भारतातील सर्व राज्यांची माहिती युट्युबवर सादर करणाऱ्या मुलांचा वेळकर फाउंडेशनच्या वतीने प्रमाणपत्र व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
आपल्या शाळेत एक विशेष उपक्रम कराटे, श्री महादेव वेळकर यांच्या मार्गर्शनाखाली चालतो, यातील काही मुलांची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. त्यांनाही शुभेच्छा देण्यात आल्या. शाळेच्या वतीने कराटे शिक्षक श्री. महादेव वेळकर यांनाही पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
वेळकर फांउडेशन च्या वतीने शाळेतील शिक्षकांचे शिक्षक दिनानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन प्राधिकरण सदस्या श्रीमती रिया खोरजुवेकर, श्रीमती उमा सामंत तसेच श्री. विजय तेली, श्री. मंगेश वेककर, श्री. पार्सेकर व बहुसंख्येने पालक उपस्थित होते.















